विधानपरिषदेचा निकाल आज, कोण मारणार बाजी?

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज होते आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे... मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान झालं.

Updated: Jul 4, 2012, 07:49 AM IST

www.24taas.com,  नवी मुंबई

 

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी आज होते आहे. दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे... मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघासाठी तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघासाठी सोमवारी मतदान झालं. नवी मुंबईतल्या कोकण भवन इथं ही मतमोजणी होणारा आहे.

 

मुंबई आणि ठाणे पदवीधर मतदार संघाकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे, भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर आणि मनसेच्या पाठिंब्यासह रिंगणात असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर निलेश चव्हाण यांच्यात रंगतदार लढतीची अपेक्षा आहे.... हा मतदार संघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.  पण यावेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन डावखरेंच्या उमेदवारीनं चूरस निर्माण झाली.

 

मुंबई पदवीधरसाठी शिवसेनेचे विद्यमान आमदार दीपक सावंत रिंगणात आहेत. त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. तर मुंबई शिक्षक मतदार संघात शिक्षकभारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील आणि शिवसेना पुरस्कृत भाजप बंडखोर मनीषा कायंदे यांच्यात लढत आहे.