पावसाचा हाहाकार, रस्त्याला ४० फूट खोल खड्डा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीकडून भूईबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणा-या मार्गात 15 मीटर रस्ता खचलाय. हा रस्ता 40 फूट खचला आहे.

Updated: Jul 4, 2012, 08:11 PM IST

www.24taas.com, कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीकडून भूईबावडा मार्गे कोल्हापूरकडे जाणा-या मार्गात 15 मीटर रस्ता खचलाय. हा रस्ता 40 फूट खचला आहे.

 

त्यामुळे या मार्गावरून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीए. यापूर्वी कोल्हापूरकडे जाणा-या रस्त्यात करुळ घाटात दरड कोसळली होती. करुळ घाटातील दरड अर्धवट उचलण्यात आल्यामुळे करुळ घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे.

 

मात्र भूईबावडा घाटात रस्ता खचल्याने कोल्हापूरकडे सिंधुदुर्गमधून जाणा-या प्रवाशांचे हाल होताएत. ही सर्व वाहतूक आता फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली असून फोंडाघाटला वाहतुकीचा ताण वाढलाए. दरम्यान पंधरा दिवस हा मार्ग बंद राहणारेए.

 

पावसामुळे दुबारी पेरणीचं संकट

दरम्यान, कोकणात गेल्या चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. भातशेतीत 24 तासांपेक्षा जास्त वेळ पुराचं पाणी राहिल्यामुळे पेरणी कुजून गेलीए. खाडीकिनारी भाग असलेल्या मसुरे, काळसे,सरंबळ, वैभववाडी इथं मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचं संकट आहे. कृषी अधिका-यांनी या भागाची पाहणी करुन शेतक-यांना दिलासा दिलाय.

गणपती पुळेला पुराचा तडाखा

रत्नागिरीतील गणपतीपुळे परिसरात मुसळधार पाऊस सुरुच असून एक दिवसाच्या फरकानं गणपतीपुळ्याला पुन्हा पुराचा तडाखा बसलाय. पावसाची संततधार सुरुच असल्यामुळे शेती पाण्याखाली गेलीए. तर रस्तेही वाहून गेलेत. रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पुर्णपणे बंद झाली असून नागरिकांचे हाल होत आहेत.