www.24taas.com, ठाणे
ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीत सत्तासंघर्ष भडकल्याने त्याची झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने कालपासून ठाणे बंदची हाक दिली.
काल मध्यरात्रीपासून ठाणे बंदला हिंसक वळण लागलं त्याता जवळपास ४० हून अधिक बसेसची तोडफोड शिवसैनिकांनी केली. आज दिवसभरात ठाणा बंद राहिल्याने ठाणेकरांचे अक्षरश: हाल झाले. त्यामुळे ठाणेकरांनी या घृणास्पद राजकारणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. महापौरपद मिळवण्याच्या संघर्षात लोकशाहीची विटंबना राजकीय पक्षांनी केली असल्याची जळजळीत प्रतिक्रिया ठाण्यात उमटली आहे.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी लोखंड गायब प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. तर नौपाडा पोलीस ठाण्यात आव्हाडांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे सेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांच्या गुंडांनीच लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अपहरण केल्याचा आरोप केला आहे. तसंच लोखंडे यांच्या जीवाला दगाफटका होण्याची संशयही व्यक्त केला आहे.