गणपतीपुळे गावात बिबट्या घुसला

गणपतीपुळे जवळील निवेडी कोठारवाडीमध्ये आज दुपारी अचानक बिबट्या घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यानं दोन म्हशींना आत्तापर्यंत जखमी केलं असून संपूर्ण गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.

Updated: May 10, 2012, 04:41 PM IST

www.24taas.com, गणपतीपुळे

गणपतीपुळे जवळील निवेडी कोठारवाडीमध्ये आज दुपारी अचानक बिबट्या घुसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बिबट्यानं दोन म्हशींना आत्तापर्यंत जखमी केलं असून संपूर्ण गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे.

संपूर्ण गावात हा बिबट्या फिरत असूनही वनविभागाच्या हाती मात्र अजूनही लागलेला नाही. मात्र या बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत असल्यामुळे त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याची गरज आहे.

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान गावकरी बिबट्याचा पाठलाग करताना बिबट्याला थोडीशी दुखापत झाली आहे. बिबट्या अचानक गावात आल्याने मात्र एकच घबराट पसरली आहे.