कोकणचा विकास बाकी आहे - कामत

देशातील अन्य पर्यटनस्थळे ज्या पद्धतीने विकसित झाली, त्या तुलनेत कोकणचा विकास आजही झालेला नाही. कोकणातील अनेक ठिकाणे दु्र्लक्षीत आहेत. ती प्रकाशात येण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे असून, याकरिता कोकणच्या सर्वंकष विकासाकरिता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक विठ्ठल कामत यांनी व्यक्त केले.

Updated: Apr 14, 2012, 09:28 AM IST

www.24taas.com, मुंबई 

 

 

देशातील अन्य पर्यटनस्थळे ज्या पद्धतीने विकसित झाली, त्या तुलनेत कोकणचा विकास आजही झालेला नाही. कोकणातील अनेक ठिकाणे दूर्लक्षित आहेत. ती प्रकाशात  येण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे असून, याकरिता कोकणच्या सर्वंकष विकासाकरिता प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत उद्योजक विठ्ठल कामत यांनी व्यक्त केले.

 

 
कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्लोबल कोकण महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवात  ‘कोकण पर्यटन विकासाची दिशा’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  विकासाची प्रक्रिया ही सर्वंकष असणे गरजेचे असून, यात स्थानिकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. याकरिता स्थानिकांची उदासीनता दूर होणेही गरजेचे आहे, अशी खंत कामत यांनी यावेळी व्यक्त केली.

 

 

 

कोकणच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री छगन भुजबळ  यांनी केले. त्यांनी वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भरलेल्या ग्लोबल कोकण महोत्सवाला  भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  या वेळी  भुजबळ  यांचा सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. ग्लोबल कोकण महोत्सवाचे अध्यक्ष द. म. सुकथनकर यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा झाला.

 

 

 

सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले, एका वर्षात पर्यटकांची संख्या एक लाखावरून १२ लाखांपर्यंत नेण्याचा चमत्कार सिंधुदुर्गातील समुद्राखालच्या सफरींमुळे शक्य झाला आहे. यामुळे कोकणातल्या तरुणांना रोजगाराचे नवे क्षेत्र खुले झाले आहे. परंतु एकीकडे पर्यटनात वाढ होत असताना नियोजनाचा मात्र अभाव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी कोकणातील संस्कृती, आदरातिथ्य, निसर्गसंपदा, पर्यावरण, पर्यटन  आदी मुद्दय़ांच्या अनुषंगाने कोकणाचे महत्त्व विषद केले. तसेच खरा भारत जर पाहायचा असेल तर कोकणात या, असे आवाहनही केले.

 

 

 

या परिसंवादामध्ये मैत्रेय उद्योग समूहाच्या अध्यक्षा वर्षाताई सत्पाळकर, अभिनेते मिलिंद गुणाजी, कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सावे तसेच साहसी पर्यटनतज्ज्ञ विभास आमोणकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="82336"]