सोलापूरला पाणी देणार नाही, परांडा बंद

मुख्यमंत्र्यांनी सीना कोळेगाव धरणातील पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. पाणी सोडण्याच्या निषेधार्थ परांडा शहर बंद करण्याचं आवाहन सर्वपक्षिय नेत्यांकडून करण्यात आल आहे.

Updated: May 27, 2012, 12:09 PM IST

www.24taas.com, उस्मानाबाद

मुख्यमंत्र्यांनी सीना कोळेगाव धरणातील पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे तीव्र पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. पाणी सोडण्याच्या निषेधार्थ परांडा शहर बंद करण्याचं आवाहन सर्वपक्षिय नेत्यांकडून करण्यात आल आहे.

परांडा शहरात रात्रीपासून तणावाची स्थिती आहे, परांडा शहरात आणि सीना कोळेगाव धरण परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत. शिवाय राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही भूमिगत झाल्याची माहिती आहे, सीना कोळेगाव धरणाचे पाणी पिण्यासाठी सोलापूरला सोडण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे उस्मानाबादच्या लोकप्रतिनिधीमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी आहे.

कोणत्याही परिस्थितीत सिना कोळेगावचे पाणी सोलापूरला देणार नाही असा आक्रमक पवित्रा उस्मानाबादमध्ये लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात दोनदा बैठक घेवूनही विरोधाचा सूर कायम आहे. उलटपक्षी मुख्यमंत्री पाणी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्यामुळे या नाराजीचे असंतोषात रुपांतर होण्याची चिन्ह आहेत.