विलासराव - अशोक चव्हाण यांचे मनोमिलन?

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.

Updated: Mar 24, 2012, 06:15 PM IST

www.24taas.com, नांदेड

माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांनी आज नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रकारे भेट घेऊन दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांचे मनोमिलन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांमधील कटुता संपल्याची चर्चा आहे.

आदर्श घोटाळ्यामुळं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले अशोक चव्हाण सध्या राजकीय अज्ञातवासात आहेत. तर विलासराव देशमुख केंद्रीय मंत्रिपद भुषवत असले तरी आदर्श घोटाळ्यात आलेले नाव आणि गोरेगावमधील जमीन सुभाष घईंना दिल्यांप्रकरणी तेही चांगलेच अडचणीत आलेत. त्यामुळं हे दोन माजी मुख्यमंत्री एकत्र आल्याची चर्चा आहे.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना लातूरमधील नियोजित विभागीय कार्यालय नांदेडला नेण्याचा निर्णय घेतल्यानंतर या दोघांमध्ये कटुता निर्माण झाली होती.