www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात मनसेत बंडाचे वारे वाहू लागले आहेत. विश्वासात न घेता जिल्हा परिषेत आघाडीला पाठिंबा दिल्यानं आमदार हर्षवर्धन जाधव नाराज आहेत. जाधव हे मनसेला रामराम ठोकण्याची चर्चा आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला समर्थन दिल्यामुळं आता मनसेमध्येच बंडाचे वारे वाहू लागले आहेत. कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना विश्वासात न घेताच आघाडीला समर्थन दिल्यामुळं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या दोन समर्थक जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळं जाधव आता मनसेला रामराम ठोकणार का अशा चर्चेला तोंड फुटले आहे.
आघाडीला पाठिंबा देण्यासाठी आमदार या नात्याने मला कोणीही विचारात घेतलेले नाही. मनसेच्या भूमिकेमुळे हे धक्कातंत्र आहे. भविष्यात पक्षाला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आघाडीला पाठिंबा देण्याचा विचार करण्याची गरज होती, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. नाराज झालेले जाधव मनसेला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
व्हिडिओ पाहा..
[jwplayer mediaid="70832"]