www.24taas.com, औरंगाबाद
राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना, आमदारांच्या परदेश दौऱ्याला राज ठाकरें पाठोपाठ अण्णा हजारेंनीही विरोध दर्शवला आहे.परदेशदौरे करणाऱ्यांना गावबंदी करावी.
ही भूमिकाही योग्यच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इतके दौरे करुन काय साधलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक नागरिकाने या दौऱ्याला विरोध करायला हवा अशी भूमिका अण्णांनी मांडली आहे.
करोडो रूपयांचे पॅकेज देऊनही दुष्काळ संपत नाही. असा टोला अण्णांनी हाणला आहे. आम्ही पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबवतो. मात्र सरकार पैसे अडवा, पैसे जिरवा मोहीम राबवते असेही वक्तव्य अण्णा हजारेंनी केलं. पॅकेजचा पैसा गरजूंपर्यंत जात नाही तर राजकारण्यांच्या घशात जातो असा आरोपही अण्णांनी केला आहे.