www.24taas.com, परभणी
परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात परिचारिकांच्या नियुक्तीबाबत भोंगळ कारभार समोर आला आहे. परिचारिकांना 2007पासून 18 महिन्याच्या कालावधीकरीता बाँडवर सेवेत असलेल्या कायम स्वरूपी असल्याचे भासवून सलग विनाखंड पाच वर्षे काम करवून घेतलं.
या दरम्यान कायमस्वरूपी कर्मचा-यांप्रमाणे सर्व सुविधा या अधिपरिचारिकांना देण्यात येत होत्या. त्यानंतर मात्र औरंगाबाद उपसंचालक कार्यालय जागे झाले, या परिचारिकांना एक दिवसाचा खंड देऊन पुन्हा बाँड करण्याचे आदेश दिले. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने हे प्रकरण अंगलट येताच याची तात्काळ अंमलबजावणी केली . मात्र नोकरीत कायमस्वरूपी नसल्याचे समजल्याने या अधिपरिचारीका संतप्त झाल्या.