मुंबई १३/७ बॉम्बस्फोट प्रकरणी हवाला ऑपरेटरला अटक

कुवरनैन पथरीजा या हवाला ऑपरेटर दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. मुंबईत झालेल्या १३/७ बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार यासीन भटकळला दहा लाख रुपये पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

Updated: Jan 31, 2012, 06:34 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

कुवरनैन पथरीजा या हवाला ऑपरेटर दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. मुंबईत  झालेल्या १३/७ बॉम्बस्फोटातील प्रमुख सूत्रधार यासीन भटकळला दहा लाख रुपये पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणी नकी अहमद वसी अहमद शेख आणि नदीम अशफाक शेख या दोन आरोपींना बिहारमधून अटक केली होती. याव्यतिरिक्त मुंब्रा येथील आणखी एका आरोपीलाही एटीएसने अटक केली आहे.

मुंबईत झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २७ जण मृत्यूमुखी पडले होते. महाराष्ट्र एटीएसने या बॉम्बस्फोटाचा १८ राज्यांमध्ये कसून तपास केला होता तसंच १२३७३ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. एटीएसने तब्बल १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून धागेदोरे शोधून काढले.