www.24taas.com, नवी दिल्ली
महागाईनं अगोदरच कंबरड मोडलेल्या भारतीयांना आता रेल्वे भाडेवाढीचाही सामना करावा लागणार आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच रेल्वेच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
अर्थ मंत्रालयाकडून रेल्वेला दिल्या जाणाऱ्या सेवा करांमध्ये सूट पुढे कायम राहण्याची चिन्हं दिसत नसल्यानं रेल्वे मंत्रालयाला भाडेवाढीच्या पर्यायाचा अवलंब करावा लागेल. त्यामुळे रेल्वेच्या वातानुकुलित आणि प्रथम श्रेणीच्या दरांत ३.६ टक्के वाढ होण्याचा संभव आहे. केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सूट काढून घेण्यात आल्या तर रेल्वेला जवळजवळ ५,५०० ते ६००० करोड रुपयांचा अतिरिक्त ताण सहन करावा लागेल. आणि त्यासाठी रेल्वेची तयारी नाही त्यामुळे उपाय म्हणून भाडेवाढीचा पर्याय स्विकारला जाऊ शकतो.
सूत्रांच्या माहितीनुसार, रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांनी मागच्याच आठवड्यात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून सेवा करांमध्ये सूट देण्याची मागणी केली होती. पण त्यावर उत्तर मात्र अजूनही मिळालेलं नाही.
.