राष्ट्रपती निवडणूक : १९ जुलैला मतदान

राष्ट्रपती निवडणुकीचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. 19 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज निवडणुकीची घोषणा केलीय. 22 जुलैला मतमोजणी होणार आहे.

Updated: Jun 12, 2012, 10:06 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्ट्रपती निवडणुकीचं काउंटडाऊन सुरु झाले आहे. 19 जुलैला राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी आज निवडणुकीची घोषणा केलीय. 22 जुलैला मतमोजणी होणार आहे.

 

16 ते 30 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 2 जुलैला अर्जाची छानणी होणार आहे तर 4 जुलै अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झालीय आणि काऊंटडाऊन सुरु होताच राजधानी दिल्लीत नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

 

राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपले पत्ते जाहीर न केलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोनिया गांधींच्या आग्रहावरून दिल्लीत दाखल झाल्यात. उद्या त्या सोनियांना भेटणार आहेत. पण त्याआधीच आज त्यांनी समाजवादी पार्टीच्या मुलायम सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.  मुलायम आणि ममतांकडे लक्षणीय मतं असल्यानं या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

 

मुलायम सिंह यांनीही आपले पत्ते उघड केलेले नाहीत. प्रणव मुखर्जींच्या नावावर सोनिया गांधी सर्वसंमती घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी घटक पक्षांची मान्यता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.ममतांची भेट हा त्याचाच भाग असून उद्याच्या भेटीत काय चर्चा होते यावर यूपीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण हे ठरणार आहे.