'राज' बाबा रामदेवांवर नाराज, फेकली शाई

योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत काळं टाकण्यात आलं. काळं टाकणा-याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. काळं फेकणा-याला रामदेव यांच्या समर्थकांनी मारहाण केली.

Updated: Jan 14, 2012, 02:16 PM IST

www.24taas.com , नवी दिल्ली 

योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत काळं टाकण्यात आलं. काळं टाकणा-याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. काळं फेकणा-याला रामदेव यांच्या समर्थकांनी मारहाण केली.

एकाएकी बाबा रामदेव  यांच्यावर काळं फेकल्यानं खळबळ माजली. बाबा रामदेव यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावर आज शनिवार एका राज नावाच्या व्यक्तीने काळी शाई फेकल्याने खळबळ उडाली. काळं फेकणा-या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आली.  मात्र,  शाई फेकण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, आमच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. परंतु, आम्ही भ्रष्टाचार विरोधातील लढाई मागे घेणार नाही, या घटनेनंतर बोलताना बाबा रामदेव  यांनी स्पष्ट केलं आहे.