www.24taas.com, नवी दिल्ली
भ्रष्टाचाराच्या मुद्यावर यापुढे कठोर भूमिका घेतली जाईल, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनावलं आहे. युपीए - २ला तीन वर्षे पूर्ण झाली.
आज सकाळी काँग्रेसचे मंत्री आणि पदाधिकारी यांच्यासमोर सोनियांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आपली कठोर भूमिका स्पष्ट केली. घोटाळ्यांच्या आरोपांनी युपीएची प्रतिमा काळवंडली असताना सोनिया गांधींचे वक्तव्य महत्वाचे आहे.
यापुढे भ्रष्टाचार सहन करणार नाही आणि भ्रष्टाचाऱ्यांची खैर केली जाणार नाही, अशा शब्दांत सोनियांनी पक्षाच्या बैठकीत इशारा दिला. मात्र आता नक्की घोटाळे कसे थांबवणार यासाठी मात्र सोनिया गांधींना आता चांगलेच लक्ष घालावे लागणार आहे.