मोदींविरुद्ध संघाने फुंकला 'पांचजन्य'

भाजप आणि संघात सध्या सगळं काही आलबेल असल्याचं चित्र नाही. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’मधून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मोदी यांच्या कार्यपद्धतीबाबत संघानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

Updated: Jun 2, 2012, 09:45 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

भाजप आणि संघात सध्या सगळं काही आलबेल असल्याचं चित्र नाही. संघाचं मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’मधून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आलंय. मोदी यांच्या कार्यपद्धतीबाबत संघानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

 

मोदींनी आपल्या कार्यपद्धतीबाबत विचार करावा आणि संघटनात्मक क्षमतेचा विचार करावा असं लेखात सुचवण्यात आलंय. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी झालेल्या संजय जोशी प्रकऱणाबाबत मोदींच्या भूमिकेबाबत सवाल उपस्थित करण्यात आलाय. संजय जोशी नसतील तरच आपण येऊ असा पवित्रा घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आलय. मोदी जर संघाची विचारधारा मानतात तर मग संघ कार्यकर्ता असलेल्या संजय जोशींबाबत त्यांनी असा पवित्रा का घ्यावा असा सवाल विचारण्यात आलाय.

 

संजय जोशी यांच्या उपस्थितीचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून मीडियाला संघ आणि भाजपबद्दल उलटसुलट बातम्या देण्याची संधी मोदींनी का दिली, असा सवाल लेखामध्ये विचारण्यात आलाय. त्याचबरोबर भाजपमध्ये पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे अनेक नेते आहेत, असंही ‘पांचजन्य’मध्ये म्हणण्यात आलंय.

Tags: