www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत आज पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, २७ जणांना पद्मभूषण तर ७७ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेत. शबाना आझमी यांना अभिनयाच्या दैदिप्यमान कारकिर्दीसाठी त्यांना पद्मभुषणनं सन्मानित करण्यात येणार आहे.
अंकुर, स्पर्श,शर्थ,मासूम, जुनून, शतरंज के खिलाडी, अर्थ, गॉडमदर, तेहजीब,खंडर, पार अशा सिनेमांमधल्या उत्कृष्ट अभिनयाच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर अभिनेते धर्मेंद्र यांनाही त्यांच्या सदाबहार अभिनयासाठी पद्मभूषण देण्यात येणार आहे. आई मिलन की बेला,फूल और पत्थर, सीता और गीता,राजा जानी, शराफत, जुगनू,दोल्त, चाचा भतीजा, चुपके चुपके, शोले, अपने, यमला पगला दिवाना अशा अनेक हिट सिनेमा धर्मेंद्र यांच्या नावावा आहेत.
गेली अनेक दशकं हिदी सिनेरसिकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल धर्मेंद्र यांना गौरवण्यात येणार आहे. तर गायक अनुप जलोटा यांनाही पद्मश्रीनं गोरवण्यात येणार आहे. भजन आणि अभंग गायनात जलोटांनी केलेल्या भरीव कामगिरी बद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. धार्मिक भजन गायकी लोकप्रिय करण्यात त्यांचा मोटा वाटा आहे.
1. | Shri K GSubramanyan | Art-Painting & Sculpture | West Bengal |
2. | Late Shri Mario De Miranda | Art-Cartoonist | Goa* |
3. | Late (Dr.)BhupenHazarika | Art- Vocal Music | Assam* |
4. | Dr. KantilalHastimal Sancheti | Medicine - Orthopedics | Maharashtra |
5. | Shri T V Rajeswar | Civil Service | Delhi |
Smt. Shabana Azmi | Art - Cinema | Maharashtra | |
Shri Khaled Choudhury | Art - Theatre | West Bengal | |
Shri Jatin Das | Art - Painting | Delhi | |
Pandit Buddhadev Das Gupta | Art - Instrumental Music - Sarod | West Bengal | |
Shri Dharmendra SinghDeol alias Dharmendra | Art - Cinema | Maharashtra | |
Dr. TrippunithwraViswanathan Gopalkrishnan | Art - Classical vocal and instrumental music | Tamil Nadu | |