पंतप्रधान कार्यालयही आता 'ट्विटर'वर

भारताच्या विदेश मंत्रालयानंतर आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ऑफिसनेही ट्विटरच्या जगात प्रवेश घेतला आहे.टीव्ही पत्रकार पंकज पचौरी पंतप्रधानांचे संचार सल्लागार बनल्यापासून जगभरात अभिव्यक्तीचं नवं माध्यम ठरलेल्या ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने हजेरी लालेली आहे.

Updated: Jan 24, 2012, 10:16 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

भारताच्या विदेश मंत्रालयानंतर आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ऑफिसनेही ट्विटरच्या जगात प्रवेश घेतला आहे.टीव्ही पत्रकार पंकज पचौरी पंतप्रधानांचे संचार सल्लागार बनल्यापासून जगभरात अभिव्यक्तीचं नवं माध्यम ठरलेल्या ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने हजेरी लालेली आहे.

पंतप्रधानांच्या सूत्राकडून सांगण्यात आलं आहे की पंतप्रधानांच्या कार्याला जनतेच्या अधिकार क्षेत्रात असायलाच हवं. त्यामुळे सरकार आपल्या हितार्थ काय काम करत आहे याची जनतेला थेट माहिती मिळेल.

म्हणून ट्विटर अकांऊंट उघडण्यात आलं आहे. या ट्विटर अकांऊंटमध्ये पंतप्रधानांच्या कामाबद्दल माहिती दिली जाईल.