नहरमध्ये सापडलेली हाडं भंवरीदेवीचीच, एफबीआयचा दावा

आत्तापर्यंत अंधारात चाचपडणाऱ्या एफबीआयला भंवरदेवी हत्याकांड प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा मिळालाय. एफबीआयच्या म्हणण्यानुसार तपासामध्ये राजस्थानच्या ‘नहर’मध्ये सापडलेला हाडांचा सांगाडा हा भंवरीदेवीचाच आहे. तसा अहवालही एफबीआयनं सीबीआयकडे सुपूर्द केलाय.

Updated: Jun 21, 2012, 11:08 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

आत्तापर्यंत अंधारात चाचपडणाऱ्या एफबीआयला भंवरदेवी हत्याकांड प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा मिळालाय. एफबीआयच्या म्हणण्यानुसार तपासामध्ये राजस्थानच्या ‘नहर’मध्ये सापडलेला हाडांचा सांगाडा हा भंवरीदेवीचाच आहे. तसा अहवालही एफबीआयनं सीबीआयकडे सुपूर्द केलाय.

यावर्षीच्या सुरुवातीला जोधपूर शहरानजीकच्या नहर या गावात एका 36 वर्षीय महिलेची हाडं सापडली होती. यामध्ये दात आणि कवटीचाही समावेश होता. ही हाडं भंवरीदेवीचीच असल्याचं एफबीआयनं सांगितलंय. सीबीआयला 4 दिवसांच्या तपासणीत बॅग, मनगटी घड्याळ, नथनी, काही तुटलेले आभूषण, कानातले झूल, जाळलेल्या हाडांचे काही तुकडे, पाच दात, लाकडाची बॅट, दोन देशी पिस्तूल आणि काही कपडे सापडले होते. यातील कपडे आरोपी कैलास जाखडचे असल्याचं सांगितलं गेलं. सीबीआयनंही हे सगळं सापडलेलं सामान भंवरीदेवीचंच असल्याचा दावा केला होता. हा एक महत्त्वपूर्ण पुरावा सीबीआयच्या हाती लागलेला होता. सीबीआयनं हे सगळे पुरावे तपासणीसाठी डीएनए परिक्षणात हातोटा असलेल्या एफबीआयकडे पाठवले होते.

केंद्रीय तपास पथकानं पुखराज, दिनेश आणि रेशमाराम यांच्याविरुद्ध अपहरण आणि हत्या प्रकरणात तीन आरोपपत्र दाखल केले आहेत. मात्र, सध्या जेलमध्ये असलेल्या मलखान सिंह याची अद्यापही फरार असलेली बहिण इंदिरा बिश्नोई हिच्याविरुद्ध तपास अजूनही प्रलंबित आहे.

.