[caption id="attachment_448" align="alignleft" width="350" caption="दिल्ली स्फोटाबाबत संभ्रम."][/caption]
झी 24 तास वेब टीम, दिल्ली
दिल्लीला हादरवणा-या स्फोटाला 33 तास होऊनही अजून सुत्रधार सापडलेले नाहीत. तपास वेगात सुरू असला तरी या स्फोटामागे कोण आहे हे स्पष्ट झालेलं नाही. या स्फोटामागे कोण हुजी की मुज्जाहिद्दीन हे स्पष्ट झालेलं नाही. दोघांनाही हा स्फोट घडवल्याचा दावा केलाय. आता पुन्हा मंगळवारी इंडियन मुजाहिद्दीननं बॉम्बस्फोट घडवण्याचा इशारा दिलाय. तसंच बुधवारचा बॉम्बस्फोट हुजी नव्हे इंडियन मुजाहिद्दीननं घडवल्याची दर्पोक्ती करत आहे.
मंगळवारी स्फोट घडवू असा इशारा त्यांनी दुस-या या इमेलमध्ये दिलाय. ही धमकी एनआयएनं गांर्भीयानं घेत तपास सुरू केलाय. मात्र दिल्लीकरांवरची संकट काही संपत नाहीत असचं दिसतय. दिल्ली बॉम्बस्फोटासंदर्भात धमकीचा आता तिसरा ई-मेल मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. हा मेल याहू अकांऊटवरून पाठवण्यात आलाय. केंद्र सरकारनं यासंदर्भात याहूकडे विचारणा केलीए.. तपास वेगात सुरू असला तरी या स्फोटामागे कोण हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. या स्फोटामागे हुजी की इंडियन मुजाहिद्दीनहे स्पष्ट झालेलं नसल्यानं पोलीस सुध्दा संभ्रामात आहे. दोघांनीही स्फोट घडवल्याचा दावा केलाय.