दिल्लीत भाजपची विजयी हॅटट्रिक

दिल्लीचे राजकीय तख्त पुन्हा भारतीय जनता पक्षाने काबिज केले आहे. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून काँग्रेसला धूळ चारली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मोठा धक्का मानला जात आहे. तिनही महापालिकेत भाजप पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे.

Updated: Apr 17, 2012, 05:46 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली  

 

 

दिल्लीचे राजकीय तख्त पुन्हा भारतीय जनता पक्षाने काबिज केले आहे. सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून  काँग्रेसला धूळ चारली आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मोठा धक्का मानला जात आहे. तिनही महापालिकेत भाजप पुन्हा सत्तेत विराजमान होणार आहे. या विजयामुळे भाजपच्या गोठात आनंदाचे वातावरण आहे. विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

 

 

 

दिल्लीत  पूर्व, उत्तर आणि दक्षिण विभागांतील तिनही महापालिकांच्या निवडणुकीतील २७२ वॉर्डांपैकी आत्तापर्यंत १२८ वॉर्डांचे निकाल जाहीर झालेत. भाजपाने ६८ जागा जिंकल्या असून काँग्रेसने ४० जागांवर मिळवला आहे. तर बहुजन समाजवादी पक्षाने पाच जागा जिंकल्या असून, राष्ट्रीय लोक दलाने दोन तर जनता दल आणि इंडियन नॅशनल लोक दलाने प्रत्येकी एक जागा पटकावली आहे.

 

 
दक्षिण दिल्ली महापालिका विभागातील १०४ वॉर्डांपैकी भाजपने ४३ जागांवर आघाडी मिळवली आहे.  काँग्रेसने ३० जागांवर तर इतर पक्षांनी २६ जागांवर आघाडी घेतली. तसेच उत्तर दिल्ली पालिका विभागातील १०४ वॉर्डांपैकी भाजपने ६१ जागांवर आघाडी घेवून काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसने १६ जागांवर आणि इतप पक्षांनी चार जागांवर आघाडी मिळवली.