'गोध्रा' दंगल रोखण्यात मोदी अपयशी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना गुजरात हायकोर्टानं दणका दिला आहे. २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगली मोदी सरकार रोखू शकलं नाही, त्याचबरोबर या दंगलींमध्ये धार्मिक संघटनांचं झालेलं नुकसान रोखण्यात सरकार अपयशी ठरलं. अशी टिप्पणी गुजरात हायकोर्टानं केली आहे.

Updated: Feb 8, 2012, 03:23 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद 

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना गुजरात हायकोर्टानं दणका दिला आहे. २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगली मोदी सरकार रोखू शकलं नाही, त्याचबरोबर या दंगलींमध्ये धार्मिक संघटनांचं भरपूर नुकसान झालं. हे नुकसान रोखण्यात सरकार अपयशी ठरलं. अशी टिप्पणी गुजरात हायकोर्टानं केली आहे.

 

‘इस्लामिक कमिटी ऑफ गुजरात’तर्फे गुजरात सरकारच्या विरोधात हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. दंगली उसळल्यानंतर त्या रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलायला हवी होती. मात्र राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही, असे या याचिकेत म्हटले होते.

 

२००२ च्या दंगलीत अनेक निष्पाप लोक मारले गेले. त्याचबरोबर प्रार्थनास्थळांचंही नुकसान झालं आहे. त्या प्रार्थनास्थळांची पुन्हा दुरुस्ती करून ते सर्वांसाठी खुले करण्यात यावे, असे आदेश गुजरात हायकोर्टान आज दिले आहेत. धार्मिक स्थळांचं या दंगलीत प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे गुजरात सरकारनं पीडितांना नुकसानभरपाई द्यावी, अशी सूचना गुजरात हायकोर्टानं केली आहे. त्यामुळे मोदींना हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

 

[jwplayer mediaid="44099"]