केजरीवालांनी केली थकबाकी परत

'टीम अण्णां'चे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी प्राप्तिकराची नऊ लाख रुपयांची थकबाकी सरकारला परत केली आहे.

Updated: Nov 4, 2011, 05:21 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

 

'टीम अण्णां'चे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी प्राप्तिकराची नऊ लाख रुपयांची थकबाकी सरकारला परत केली आहे.
केजरीवाल यांनी डॉ. सिंग यांच्याकडे धनादेश पाठवून दिला. धनादेशासोबत चारपानी पत्रही त्यांनी पाठवले आहे. ही रक्कम मी परत करत आहे, याचा अर्थ मला चूक मान्य आहे, असा नव्हे; तर निषेधापोटी मी ही रक्कम परत केली आहे, असे ते म्हणाले.
मुळात मी कोणती चूक केलेली आहे, हेच जर मला माहीत नाही, तर ती न केलेली चूक मान्य करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. प्रशासकीय सेवेचा माझा राजीनामा स्वीकारण्यास अर्थ खात्यास सांगावे; जेणेकरून मला या थकबाकीचा परतावा मिळण्यासाठी न्यायालयात दावा करता येऊ शकेल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.