कृपाशंकरांवर सुप्रीम कोर्टाचीही नाही ‘कृपा’

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून तूर्तास दिलासा नसल्याचे आज झाल्या सुनावणीनंतर स्पष्ट झाले. तांत्रिक बाबीमुळे कृपाशंकर सिंह यांची सुनावणी झालीच नाही, त्यामुळे आता याचिकेवरील पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार असल्याचे न्या. पी. के. जैन यांनी सांगितले.

Updated: Mar 2, 2012, 03:44 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली

 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून तूर्तास दिलासा नसल्याचे आज झाल्या सुनावणीनंतर स्पष्ट झाले. तांत्रिक बाबीमुळे कृपाशंकर सिंह यांची सुनावणी झालीच नाही, त्यामुळे आता याचिकेवरील पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार असल्याचे न्या. पी. के. जैन यांनी सांगितले.

 

 

मुंबई हायकोर्टाने कृपाशंकर सिंह यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने तांत्रिक बाब पुढे करून सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

 

आता कृपाशंकर सिंह यांच्यासमोरील सर्व पर्याय संपले असून ते कोणत्याही क्षणी स्वतःला मुंबई पोलिसांच्या हवाले करू शकतील अशी शक्यता आहे.

 

दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील दोन घरांवर  आणि ऑफिसवर छापा  मारला आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा मारला छापा मारला आहे. दरम्यान, कृपाशंकर यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

 

ऑफिसमधील काही कागदपत्रं जाळण्यात आल्याचा आरोप होत होता. आज सकाळी बांद्रामधील साई प्रसाद आणि पार्ला येथील घर आणि ऑफिसवर टाकले छापे टाकले. त्यानंतर  आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा वसईकडे वळवला आहे.  वसईतील त्यांच्या जावयाच्या एका घरावर छापा मारला आहे. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

पोलीस कृपाशंकर सिंह यांच्या घरांची झडती घेत आहेत. कागदपत्र लपविण्याचा प्रकार सुरू असल्याने हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत. तसेच  कृपाशंकर सिंह हे कुटुंबासह अज्ञातवासात आहेत. त्यांना  बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने ते अज्ञातवासात गेले आहेत.

 

 

संबंधित आणखी बातम्या

 

कृपाशंकर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव!

 

कृपाशंकरांनी मालमत्तेचे कागदपत्र जाळले?

 

कृपाशंकर सिंहांना केव्हाही होऊ शकते अटक

 

अटकेमुळे घाबरून ‘कृपाशंकर पळाले’?

 

 कृपाशंकर सिंहांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल

 

Tags: