www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्ली आणि सभोवतालचा परिसर आज दुपारी भूकंपाच्या झटक्यांनी हादरला. भूकंपाचे झटके दिल्ली शिवाय मेरठ, गाझियाबाद, नोएडा, गुडगाव आणि फरिदाबाद येथेही जाणविले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी नाही झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भूकंपाचे झटके १ वाजून १० मिनिटांनी जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी मापण्यात आली. भूकंपाचा केंद्र दिल्लीपासून ४८ किलोमीटरवर असलेल्या बहादूरगड येथे होता.
याशिवाय राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातही भूकंपाचे हलके झटके जाणवले. भूकंपानंतर लोकांनी घाबरून घराबाहेर पळ काढला. दिल्ली आणि मेरठ या भागात भूकंप किमान १० सेकंद जाणवला.