www.24taas.com, नवी दिल्ली
तुम्ही विवाह नोंदणी केली नसेल तर ती करून घ्या. कारण आता विवाह नोंदणी सक्तीची करण्यात येणार आहे. तसे केंद्र सरकराने धोरण आणले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सक्तीच्या विवाह नोंदणी प्रस्तावाला आज गुरुवारी मंजुरी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता विवाह नोंदणी करणे यापुढे अनिवार्य झाले आहे. दरम्यना, विवाह नोंदणी करताना धर्माचा खुलासा करणे गरजेचे नसल्याचा प्रस्तावही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. त्यामुळे आंतरजातीय विवाहातील अडचणी दूर झाल्या आहेत.
कायदा मंत्रालयाने सध्याच्या जन्म आणि मृत्यू नोंदणीच्या कायद्यातही संशोधनाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिख धर्मियांच्या लग्नाबाबत वेगळा कायदा करण्यात आला आहे. हे सर्व निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले आहेत.