अमेरिकेत काली मातेच्या नावाची बिअर!

अमेरिकेसह पाश्चात्य देशात हिंदू देवी-देवतांच्या चित्रांचा दुरपयोग तसेच त्यांचा विचित्र पद्धतीने केलेल्या वापरामुळे भाजपने आज राज्यसभेत आवाज उठवला आहे. अमेरिकेत एका बिअर कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव काली मातेवर ठेवले असल्याची धक्कादायक माहिती आज भाजपतर्फे राज्यसभेत देण्यात आली.

Updated: May 15, 2012, 08:18 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

अमेरिकेसह पाश्चात्य देशात हिंदू देवी-देवतांच्या चित्रांचा दुरपयोग तसेच त्यांचा विचित्र पद्धतीने केलेल्या वापरामुळे भाजपने आज राज्यसभेत आवाज उठवला आहे. अमेरिकेत एका बिअर कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव काली मातेवर ठेवले असल्याची धक्कादायक माहिती आज भाजपतर्फे राज्यसभेत देण्यात आली.

या संदर्भात सरकारने अमेरिकन राजदुताला बोलावून यासंदर्भात आपला निषेध व्यक्त केला पाहिजे. तसेच या संदर्भात अमेरिकेने माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी अमेरिकेत लक्ष्मी तसेच गणपतींच्या चित्रांचा वापर चुकीच्या पद्धतीने केल्याचा संदर्भ देत भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी हा मुद्दा शून्य प्रहरात उपस्थित केला.

अशा प्रकारे माता कालीचा अपमान झाला असेल तर हा गंभीर मुद्दा असल्याचे संसदीय कार्यराज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी सांगितले. या प्रकरणी परराष्ट्रमंत्रींना सभागृहाची भावना कळविण्यात येईल, असेही सांगण्यात आले.