लावणी रंगली....

ढोलकीच्या तालावर या रिएलिटी शोचा गुरुवारचा भाग असणार आहे राम कदम स्पेशल एपिसोड. यावेळी या लावण्यवतींनी एकाहून एक सरस लावण्या सादर केल्या. राम कदम स्पेशल एपिसोड असल्याने या लावण्यवती थिरकल्या त्या राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्यांवर.

Updated: Mar 1, 2012, 01:54 PM IST

www.24taas.com

 

ढोलकीच्या तालावर या रिएलिटी शोचा गुरुवारचा भाग असणार आहे राम कदम स्पेशल एपिसोड. यावेळी या लावण्यवतींनी एकाहून एक सरस लावण्या सादर केल्या. राम कदम स्पेशल एपिसोड असल्याने या लावण्यवती थिरकल्या त्या राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्यांवर.

 

पिंजरा सिनेमातल्या लावणीवर सोनाली खरेने बहारदार नृत्य पेश केलं. तर सोनाली पवारने ही लावणी सादर करुन परीक्षकांचीही दाद मिळवली. पियुषा आणि वैशालीने राम कदम यांच्या या अजरामर लावण्यांवर नृत्य सादर करत कार्यक्रमात आणखीनच रंग भरले.

 

एकूणंच राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या लावण्या आणि अप्सरांच्या फक्कड लावण्यांमुळे हा एपिसोड रंगतदार होणार हे नक्की. तर मागच्याच आठवड्यात ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचे परीक्षक म्हणून या साऱ्यांना मार्गदर्शन लाभले होते.