बिग बॉसच्या घरात चहलची परत एकदा हलचल ?

बिग बॉसमधलं वातावरण आता तापायला सुरवात झाली आहे. बिग बॉसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या महक चहलला घरात परत घेण्याबद्दल विचार चालु असल्याचं नकुत्याच बाहेर घालवण्यात आलेल्या एका स्पर्धकाने सांगितलं.

Updated: Dec 21, 2011, 12:13 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

बिग बॉसमधलं वातावरण आता तापायला सुरवात झाली आहे. बिग बॉसमधून हकालपट्टी  करण्यात आलेल्या महक चहलला घरात परत घेण्याबद्दल विचार चालु असल्याचं नकुत्याच  बाहेर घालवण्यात आलेल्या एका स्पर्धकाने सांगितलं. लक्ष्मी त्रिपाठी आणि शोनाली नागराणी  यांचाही वाईल्ड कार्ड एण्ट्रीसाठी विचार करण्यात येत होता पण आता महकने त्यात आघाडी  घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानशी कनेक्शन असलेल्या महक चहलला दोन  आठवड्यापूर्वी बिग बॉसमधनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पुजा बेदीला जेंव्हा बाहेर घालवण्यात आलं तेंव्हा तिने महक सलमानची फेव्हरीट असल्याचं सांगितलं होतं. पुजाच्या वक्तव्यानंतर महकची गच्छंती झाली होती. पण आता महकला परत एकदा संधी मिळेल अशी चिन्हं आहेत.

 

महकच्या पुर्नप्रवेशाबाबत सुरवातीपासूनच नियोजन करण्यात आल्याच्या अफवाही पसरल्या आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका सूत्राने सांगितलं की महक आणि सलमान यांच्यात घनिष्ठ मैत्री आहे आणि सलमाननेच महकला बिग बॉसमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. त्यानेच चॅनलला महकला बाहेर काढण्यास सांगितलं होतं ज्यामुळे त्याच्यात आणि महकमध्ये काही खास संबंध आहेत अशी चर्चा होऊ नये. महक चहलला याबाबतीत विचारलं असता तिने आपल्याला परत येण्याबद्दल विचारण्यात आल्याचं सांगितलं आणि संधी मिळाली तर स्कायला धडा शिकवू असंही ती म्हणाली.

 

सध्या बिग बॉसच्या घरात स्काय सह इतर चार जणांना घराबाहेर काढण्यासाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. पण त्यावेळेस चॅनलने वोटिंग लाईन्स बंद असल्याचं टिकरही चालवलं आहे. त्यामुळे येत्या शनिवारीच महक घरात परत एकदा दाखल होईल अशी चिन्हं आहेत.