'फिल्मसिटी', मिळेल का मराठी मालिकांसाठी?

गोरेगाव चित्र नगरीत चित्रीत होणा-या मराठी मालिकांना मालिकेला आता काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. फिल्मसिटीत चित्राकरणासाठी मराठी मालिकांना मिळणारी 50 टक्क्याची सवलत अचानक बंद केल्याने मराठी मालिकांचे निर्माते अडचणीत आले.

Updated: Jun 7, 2012, 09:43 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थातच फिल्मसिटी येथे मराठी मालिकांना एकूण फीमध्ये 50 टक्के सवलत मिळणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी हे आश्वासन दिलंय.

 

गोरेगाव चित्र नगरीत चित्रीत होणा-या मराठी मालिकांना मालिकेला आता काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. फिल्मसिटीत चित्राकरणासाठी मराठी मालिकांना मिळणारी 50 टक्क्याची सवलत अचानक  बंद केल्याने मराठी मालिकांचे निर्माते अडचणीत आले. ही सवलत पुन्हा सुरु करावी म्हणून निर्मात्यांनी प्रयत्न सुरु केले. याविरोधात शिवसेना आणि मनसे पक्षाने आंदोलनही केलं. या वादासंदर्भात सांस्कृतिक विभाग मंत्री, मराठी चित्रपट महामंडळ आणि निर्माते यांची बैठक नुकतीच पार पडली. उंच माझा झोका या मराठी मालिकेला तूर्तास तरी ही सवलत मिळेल अशी आशा वाटतेय. कारण त्यांना मिळणारी 50 टक्के सवलत सुरु राहणार आहे असं आश्वासन सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी दिलंय. मात्र यासंदर्भातल्या निर्णयांला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

 

जर 15 दिवसांत  सकारात्मक निर्णय दिला नाही तर याविरोधातलं आंदोलन तीव्र होईल असा इशारा शिवसेना, मनसेनं दिलाय. याबाबत संजय देवतळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चक्क नो कमेट्सचा पवित्रा घेतला. तेव्हा मराठी मालिकांच्या निर्मात्यांचे डोळे लागलेत ते पंधरा दिवसांनी लागणा-या निर्णयाकडे....