"कोण ही सनी लिऑन?"- अमर उपाध्याय

बायकांच्या अंगलटी जाण्याच्या आरोपांनी काहीही फरक पडत नसल्याचा खुलासा ‘बिग बॉस’ जिंकू न शकलेल्या अमर उपाध्यायने केला. अमर उपाध्याय ‘जास्तच’ जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो आणि अंगलट करत असतो,

Updated: Jan 10, 2012, 07:00 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बायकांच्या अंगलटी जाण्याच्या आरोपांनी काहीही फरक पडत नसल्याचा खुलासा ‘बिग बॉस’ जिंकू न शकलेल्या अमर उपाध्यायने केला. अमर उपाध्याय ‘जास्तच’ जवळीक साधायचा प्रयत्न करत असतो आणि अंगलट करत असतो, असा आरोप बिग बॉसच्याच घरातल्या शोनाली नागरानी आणि सनी लिऑनने यापूर्वी केला होता.

 

याबद्दल अमरला विचारल्यावर तो म्हणाला, “ज्या लोकांनी माझ्याबरोबर काम केलं आहे, त्या लोकांना मी कसा आहे हे माहित आहे. माझ्या कुटुंबाचाही माझ्यावर विश्वास आहे. शोनाली जे बोलली त्याबद्दल तिने माझी शंबर वेळा माफी मागितली आहे. इतर कुणालाही त्यात काही गैर वाटलं नाही. मग, कोण ही सनी लिऑन  आणि तिच्या बडबडीने काय फरक पडतो?”

 

“मी एक कुटुंबवत्सल माणूस आहे. माझं वागणं कसं आहे हे माझ्या घरच्यांना माहीत आहे. मी नेहमीच स्त्रियांचा आदर करतो. मी बिग बॉसमध्ये जिंकण्यासाठीच आलो होतो. आणि मी हे मान्यच करतो की मी ‘गेम’ खेळत होतो.” अशा शब्दात आपल्या वागण्याचं अमरने समर्थन केलं.