सलमान देणार कॅटच्या बर्थडेला सरप्राइज पार्टी

बॉलिवूड हॉटी कतरिना कैफ हिचा आज २८वा वाढदिवस आहे, पण आपला वाढदिवस सेलिब्रेट करायला बिचारीला वेळच नाही. कारण कतरिना आपल्या शुटिंगमध्ये बिझी आहे.

Updated: Jul 16, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बॉलिवूड हॉटी कतरिना कैफ हिचा आज २८वा वाढदिवस आहे, पण आपला वाढदिवस सेलिब्रेट करायला बिचारीला वेळच नाही. कारण कतरिना आपल्या शुटिंगमध्ये बिझी आहे.

 

पत्रकारांशी बोलताना कतरिना म्हणाली, “यावर्षी वाढदिवस सेलिब्रेच करण्याचा कुठलाच प्लॅन नाही. कारण आधीपासून बरीच कामं ठरली आहेत. ही कामं पूर्ण करणं मला जास्त महत्वाचं वाटतं. यामुळे यावर्षी वाढदिवसाचा कुठलाही गाजावाजा नसेल.”

 

मात्र, कतरिनाच्या एका जवळील व्यक्तीने मात्र माहिती दिली आहे की, कतरिनाचा माजी प्रियकर सलमान खान कतरिनाला सरप्राइज पार्टी देण्याच्या विचारात आहे. आणि जर ही सरप्राइज पार्टी सेलिब्रेट केली गेली, तरी त्यात केवळ अगदी जवळच्याच मित्रांना प्रवेश असेल.

 

“काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय एकत्र येऊन वांद्र्यालाच रात्री इशीरा सहभोजनाचा सोहळा पार पडू शकतो.” असं या जवळच्या व्यक्तीने सांगितलं आहे. कतरिनाचा वाढदिवस हा बॉलिवूडसाठी नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. कधी सलमान-शाहरुखच्या भांडणामुळे तर कधी शाहरुखने कतरिनाचा बर्थडे सेलिब्रेट केल्यामुळे. या वेळी मात्र सलमानला कतरिनाचा वाढदिवस सेलिब्रेट करण्याची संधी मिळणार आहे, असं दिसतंय. कतरिनाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...