शर्लिनला ओढ पुन्हा 'प्लेबॉय'च्या आमंत्रणाची

शर्लिन भारतात परतली तरी, तिचं प्लेबॉय प्रेम कमी झालेलं नाही. शर्लिनने ट्विट केलंय,”माझ्या प्लेबॉय मॅन्शनमधल्या मित्रांना मी खूप मिस करेन... पण, मी लवकरच पुन्हा तुमच्याकडे येईन.”

Updated: Jul 15, 2012, 10:46 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

'बिग बॉस ४' मधील स्पर्धक शर्लिन चोप्राने बोलघेवड्या पूनम पांडे आणि रोझलिन खान यांच्यासारख्या वारंवार कपड्यांचा त्याग करणाऱ्या सेलिब्रिटींना मागे टाकत चक्क प्लेबॉय मासिकाच्या मुखपृष्ठावर निर्वस्त्र झळकण्याचा ‘मान’ पटकावला आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिकन मासिकावर नग्न अवस्थेतील उत्तान फोटोशूट करणारी शर्लिन ही पहिली भारतीय महिला आहे.

 

शर्लिन भारतात परतली तरी, तिचं प्लेबॉय प्रेम कमी झालेलं नाही. शर्लिनने ट्विट केलंय,”माझ्या प्लेबॉय मॅन्शनमधल्या मित्रांना मी खूप मिस करेन... पण, मी लवकरच पुन्हा तुमच्याकडे येईन.”

 

पुन्हा अशा प्रकारचं फोटोशूट करण्यासाठी शर्लिन उत्सुक असल्याचं यावरून दिसतं. एवढंच नाही, तर प्लेबॉय मासिक पुन्हा फोटोसाठी शर्लिनला बोलावून घेईल अशी खात्रीदेखील तिला आहे. प्लेबॉय मॅन्शनमध्ये शर्लिनने खूप धमाल केली असावी असं तिच्या ट्विटवरून जाणवतंय.तिने पुढे असंही ट्विट केलंय, “प्लेबॉय मॅन्शनमधली जर कुठली गोष्ट मी सर्वाधिक मिस करेन तर ती म्हणजे जेवणाचं टेबल.तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना खूप खूप धन्यवाद”

 

पुन्हा प्लेबॉयच्या मुखपृष्ठावर येण्याइतकं शर्लिनने खरंच जगाला आकर्षित केलंय का? आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये काहीच कमाल करू न शकलेल्या शर्लिनला आता तरी सिनेमात संधी मिळेल का?