सलमानच्या लवलाइफचा 'द एन्ड'

सलमान खान आणि प्रेमप्रकरणं यांचे नातं कायम गहिरं राहिलं आहे. सलमानची सौंदर्यवतींबरोबरच्या अफेअर्सची यादी खूप मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरावलेली गर्लफ्रेंड कतरिना कैफबरोबर परत एकदा रिलेशनशीपचे संकेत त्याने दिले होते. पण आता सल्लूमियाला आपले डेटिंगचे दिवस संपले असल्याची जाणीव झाली आहे.

Updated: Feb 28, 2012, 05:41 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

सलमान खान आणि प्रेमप्रकरणं यांचे नातं कायम गहिरं राहिलं आहे. सलमानची सौंदर्यवतींबरोबरच्या अफेअर्सची यादी खूप मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरावलेली गर्लफ्रेंड कतरिना कैफबरोबर परत एकदा रिलेशनशीपचे संकेत त्याने दिले होते. पण आता सल्लूमियाला आपले डेटिंगचे दिवस संपले असल्याची जाणीव झाली आहे. सलमाने नुकत्याच एका शोच्या लँचच्या निमित्ताने डेटिंगची कला आपण विसरलो असल्याचं सांगत त्याच्या चाहत्यांना धक्का दिला.

 

सलमानने ४६ वर्षींची उमर गाठली असली तरी त्याच्याबद्दलचं सर्वसाधारण मत तो एटरनल लव्हर असल्याचं आहे. सलमानचे म्हणणं आहे की त्याला पूर्वीसारखी डेटिंगची कला जमत नाही. तरुणींच्या या लाडक्या कलाकाराने एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत एकेकाळी तो डेटिंगबाबतीत लकी होता असं सांगितलं होतं पण वो जमाना गुजर गया असं आता त्याचं म्हणणं आहे.

 

बॉलिवूडमध्ये सलमानची ओळख मोस्ट इलिजिबल बॅचलर अशीच आहे आणि अजूनतरी त्याची विवाहबंधनात अडकण्याची तयारी नाही. याअगोदर सोमी अली, ऐशवर्या राय आणि कतरिना कैफ यांच्याबरोबच्या त्याच्या अफेअर्सची रंगतदार चर्चा आजही चघळल्या जातात. आता कतरिनाला ऍरेंज्ड मॅरेज करायची आहे आणि सलमानही त्याच वाटेवर चालु लागला आहे.

 

पण तरीही डेटिंगच्या बाबतीत सलमानचा हात कोणी धरु शकणार नाही आणि आजही त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार असणाऱ्या ललनांची काही कमी नाही.