रा-वन vs रेडी

ठसन घ्या ठसन द्या मी स्टार प्रवाहवरच्या आता होऊन जाऊ द्या शो बद्दल बोलत नसून शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील खून्नसबद्दल लिहित आहे. रा वन प्रदर्शित झाल्यापासून सलमान खानच्या सिनेमापेक्षा अधिक कलेक्शन करण्याची शाहरुखची इर्षा लपून राहिलेली नाही. सलमान आणि शाहरुखच्या सिनेमांची बॉक्स कलेक्शनसाठीची जीवघेणी स्पर्धा सातत्याने चर्चेत आहे.

Updated: Nov 11, 2011, 03:13 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

ठसन घ्या ठसन द्या मी स्टार प्रवाहवरच्या आता होऊन जाऊ द्या शो बद्दल बोलत नसून शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील खून्नसबद्दल लिहित आहे. रा वन प्रदर्शित झाल्यापासून सलमान खानच्या सिनेमापेक्षा अधिक कलेक्शन करण्याची शाहरुखची इर्षा लपून राहिलेली नाही. सलमान आणि शाहरुखच्या सिनेमांची बॉक्स कलेक्शनसाठीची जीवघेणी स्पर्धा सातत्याने चर्चेत आहे.

रा वनच्या प्रदर्शनाला दोन आठवडे झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरची लढाई परत एकदा चर्चेत आली आहे. शाहरुखचा रा वन सलमानच्या रेडीला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पिछाडीवर टाकू शकेल अशी शक्यता या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. रा वन हा शाहरुखचा आजवरचा सर्वाधिक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. इरोस आणि किंग खान यांनी तब्बल १६२ कोटी रुपये रा वनच्या निर्मितीवर उधळले.
रा वनला समिक्षकांची पसंती मिळाली नसली तरी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केलं. आणि आता सलमानच्या रेडीच्या कलेक्शनच्या बरोबरीने त्याने कमाई करुन दाखवली आहे. रा वन रेडीच्या ६४ कोटी रुपये कलेक्शनचा आकडा सहज पार करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत हे.

यंदाच्या वर्षातला सर्वाधिक बॉक्स ऑफिस कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीच रा वनचा समावेश सहज करता येईल. आमिर खानच्या थ्री इडियटसने १०२ कोटी तर दबंगने ७४ कोटी, बॉडीगार्डने ७२ कोटी रेडी ६४ कोटी गझिनी ५८ कोटी, गोलमाल ३ने ५६ कोटी आणि सिंघमने ५० कोटी रुपये असा पैशांचा पाऊस गल्ला बारीवर पाडला. आता त्या यादीत रा वनचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.