मराठीत 'नो एंट्री'

बॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करणारा नो एंट्री आता मराठीत अवतरतोय. मिलींद कवडे दिग्दर्शित करत असलेल्या ‘नो एंट्री- पुढे धोका आहे’ च्या या मराठमोळ्या व्हर्जनचा गोव्यात मुहूर्त पार पडला.

Updated: May 18, 2012, 01:33 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करणारा नो एंट्री आता मराठीत अवतरतोय. मिलींद कवडे दिग्दर्शित करत असलेल्या ‘नो एंट्री- पुढे धोका आहे’ च्या या मराठमोळ्या व्हर्जनचा गोव्यात मुहूर्त पार पडला. भरत जाधव, अंकुश चौधरी अनिकेत विश्वासराव, क्रांती रेडकर, सई लोकूर सई ताम्हणकर अशी स्टार कास्ट पहायला मिळणर आहे.

 

अनिस बझमी दिग्दर्शित नो एंट्री या बॉलिवूड सिनेमानं लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. हलकं फुलकं कथानक, तगडी स्टारकास्ट आणि व्यावसायिक सिनेमासाठी लागणारा मसाला हाच या सिनेमाचा फॉर्म्युला होता. आता मराठी 'नो एंट्री'चा रिमेक होतोय. ‘नो एंट्री’ मसालेदार सिनेमा मराठीत अवतरतोय. दिग्दर्शक मिलींद कवडे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या सिनेमाचा मुहूर्त पार पडला. तीन मित्रांची धमाल गोष्ट असणाऱ्या या सिनेमात भरत जाधव, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव यांची जुगलबंदी पहायला मिळणर आहे.

 

तर क्रांती रेडकर सई लोकूर आणि मनवा नाईक या सिनेमात एंटरटेनिंग हाऊसवाईफचं दर्शन घडवणारेत. हिंदीतल्या नो एंट्री सारखाच हा मराठीतला नो एंट्री पुढे धोका आहे  हा सिनेमा प्रेक्षकांचं हिंदीइतकंच मनोरंजन करेल का, हे सिनेमा आल्यावर कळेलच.