फ्राय डे फिल्म रिव्ह्यू !

या वीकेण्डला रिलीज झालेल्या 'एक में और एक तू' या इम्रान करीनाच्या सिनेमानं ६५ टक्के ओपनिंग मिळवत बॉक्स ऑफिसवर चांगलं खातं उघडलं आहे. तर ‘गोळा बेरीज’ आणि ‘सतरंगी रे’ या सिनेमांनाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे.

Updated: Feb 11, 2012, 01:04 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

या वीकेण्डला रिलीज झालेल्या 'एक में और एक तू' या इम्रान करीनाच्या सिनेमानं ६५ टक्के ओपनिंग मिळवत बॉक्स ऑफिसवर चांगलं खातं उघडलं आहे. तर ‘गोळा बेरीज’ आणि ‘सतरंगी रे’ या सिनेमांनाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा विकेन्ड प्रेक्षकांसाठी फिल्मी विकेण्ड ठरणार आहे

 

इम्रान-करिना यांच्या मच अवेटेड ‘एक मैं और एक तू’वर समीक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला. मात्र प्रेक्षकांनी या हलक्याफुलक्या रोमॅण्टिक कॉमेडी सिनेमाला संमिश्र प्रतिसाद दिला. करीना पेक्षाही इम्रान या सिनेमात भाव खाऊन गेला आहे. तेव्हा ‘एक मैं और एक तू’ हा सिनेमा एकदा पहायला हरकत नाही.

 

मराठीत गोळाबेरीजला ५५ टक्के ओपनिंग देत मराठी प्रेक्षकांनी या सिनेमाचं तिकीट खिडकीवर स्वागत केलं आहे. पुल आणि पुलंच्या व्यक्तिरेखा यात पाहायला मिळतात. मराठी इंडस्ट्रीतले अनेक मातब्बर कलाकार यात झळकत आहेत त्यामुळे प्रेक्षकांची बऱ्यापैकी पसंती गोळाबेरीजला मिळत आहे.

 

यासोबत ‘सतरंगी रे’ ही युथफुल फिल्मंही भेटीला आली आहे. या सिनेमात आदिनाथ, भूषण, सिद्धार्थ, सौमिल, अमृता, पूजा ही युथफुल कास्ट यात पाहायला मिळते. या सिनेमालाही मराठी तरुणाईनं चांगला प्रतिसाद दिला आहे. एकुणच हा विकेन्ड प्रेक्षक राजासाठी फुल टू फिल्मी आहे असं म्हणायला हरकत नाही.

 

[jwplayer mediaid="45164"]