www.24taas.com, मुंबई
पॉर्न स्टार सनी लिऑन ही मुळातच पॉर्न स्टार असल्याने चर्चेत राहण्याची चांगलीच कला अवगत आहे. त्यामुळे ती आपल्या व्यावसायिक गोष्टींशी नेहमीच प्रामाणिक असते. त्यामुळे यापुढेही ती पॉर्न फिल्म करतच राहणार आहे. सनीची बॉलीवूडमध्ये झालेली एंट्री ही फक्त आणि फक्त पॉर्न फिल्ममुळेच झाली आहे. सनीने एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सनीने म्हटलं आहे की, पॉर्न फिल्ममध्ये काम करणं तिचा पेशा आहे. आणि ते ती अजिबात सोडू शकत नाही. तिचं असं म्हणणं आहे की, पॉर्न फिल्म आणि बॉलिवूडमध्ये काम करणं हे तिला योग्य वाटतं.
सनीचं म्हणणं आहे की, ती वर्षातून एकदाच पॉर्न फिल्ममध्ये काम करते मात्र त्याचबरोबर ती या इंडस्ट्रीमधील सगळ्यात पॉप्युलर अशी इमेज असणारी आहे. पण सध्या तरी कोणत्याच पॉर्न फिल्ममध्ये ती काम करीत नाहीये.
सनीचं म्हणणं आहे की, मला माहित नाही की, पुढे काय होणार आहे. पण अस कधीही होणार नाही की, मी यापुढे कधीही पॉर्न फिल्म करू शकणार नाही. कारण की, ती माझी आवड आहे. त्यामुळे मी ते करतच राहिन. सध्या सनी लिऑन पूजा भटच्या जिस्म-२ या सिनेमात काम करते आहे. आणि त्यानंतर रागिनी एमएमएस-२ मध्ये काम करणार आहे.