पूजाने मांडला सनीच्या आंतर्वस्त्रांचा लिलाव

'पेटा'साठी चॅरिटी करण्याचं पूजा भट्टने ठरवलं आणि तिने चक्क ‘जिस्म-२’मध्ये सनी लिऑनने वापरलेली आंतर्वस्त्रं लिलावात मांडली आहेत. याबद्दल सनीला विचारलं असता, तिला धक्काच बसला

Updated: Jun 13, 2012, 12:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

चॅरिटी करण्यासाठी बरेचसे सेलिब्रिटी आपल्या सिनेमातील वापरलेल्या वस्तू, कपड्यांचा लिलाव करतात. त्यातून मिळणारे पैसे एखाद्या सामाजिक संस्थांना जातात. यात शाहरुख खानच्या टी-शर्टपासून ते महेंद्रसिंग धोनीच्या बॅटपर्यंत अनेक वस्तूंचा लिलाव झाला आणि त्यातून घसघशीत चॅरिटीही झाली. पण, जर सेलिब्रिटी सनी लिऑन आणि चॅरिटी करणारी पूजा भट्ट असेल तर?

 

सनी लिऑनसारख्या आंतरराष्ट्रीय पॉर्न स्टारला पूजा भट्टने जिस्म-२ सिनेमातून बॉलिवूडमधली अभिनेत्री बनवलं. एवढंच नव्हे तर सनीला पेटा या संस्थेची ब्रँड अँबेसॅडरशीपही मिळाली. पण, आता 'पेटा'साठी चॅरिटी करण्याचं पूजा भट्टने ठरवलं आणि तिने चक्क ‘जिस्म-२’मध्ये सनी लिऑनने वापरलेली आंतर्वस्त्रं लिलावात मांडली आहेत.

 

याबद्दल बोलताना पूजा भट्ट म्हणाली, “मी सनी, रणदीप हूडा आणि अरुणोदय सिंग या अभिनेत्यांच्या सिनेमात वापरलेल्या कपड्यांचा लिलाव ठेवला आहे. यात त्यांची कटीवस्त्रंही समाविष्ट असतील. एखाद्याचे कपडे उतरवण्यातून एवढं चांगलं काम अद्याप झालेलं नाही.”आंतर्वस्त्र शब्द ऐकून लोक का चपापतात, याचं पूजा भट्टला आश्चर्य वाटतं. आंतर्वस्त्रं जर सुंदर असतील तर त्यांचा लिलाव करायला काय हरकत आहे? हॉलिवूडचे कित्येक स्टार्स आंतर्वस्त्रं लिलावात विकतात. या गोष्टींचाही मोठा ग्राहकवर्ग आहे. मला संधी मिळाली, तर मला जॅव्हियर बार्डनचं कटीवस्त्र लिलावातून विकत घ्यायला खूप आवडेल.

 

हा लिलाव ऑनलाइन पद्धतीने होईल. यात कलाकारांच्या आंतर्वस्त्रांसोबत त्यांनी ऑटोग्राफ दिलेले त्यांचे फोटो आणि हे आंतर्वस्त्रं त्यांचंच असल्याची खात्री म्हणून अस्सलतेचं प्रमाणपत्रही सोबत असेल. मात्र, याबद्दल सनीला विचारलं असता, तिला धक्काच बसला. तिला आपल्या आंतर्वस्त्रांच्या लिलावावर आक्षेप नाही. मात्र, या गोष्टीची पूजा भट्टने आपल्याला कुठलीच पूर्वकल्पना दिली नसल्याचा दावा सनीने केला आहे.