नव्या वर्षी मिळणार 'झकास' ट्रिट

२०११ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात एक हिंदी आणि एक मराठी सिनेमा रिलीज होतो आहे. सरत्या वर्षात बॉक्स ऑफीसवर कोणत्या फिल्म्स रिलीज होणार आहे. २०११ या वर्षाच्या शेवटचा आठवडा येऊन ठेपला आहे.

Updated: Dec 29, 2011, 11:48 PM IST

झी २४ तास वेब टीम

 

२०११ या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात एक हिंदी आणि एक मराठी सिनेमा रिलीज होतो आहे. सरत्या वर्षात बॉक्स ऑफीसवर कोणत्या फिल्म्स रिलीज होणार आहे. २०११ या वर्षाच्या शेवटचा आठवडा येऊन ठेपला आहे. आणि सरत्या वर्षाला गुडबाय करत नवीन वर्षाचं झकास स्वागत करण्यासाठी झी टॉकीज घेऊन आली आहे त्यांची नवी प्रस्तुती 'झकास'. अंकुश चौधरीने दिग्दर्शित केलेला झकास हा सिनेमा या फ्रायडेला रिलीज होतो आहे.

 

अंकुशने ही फिल्म फक्त डिरेक्टच केली नाही तर  या सिनेमात अंकुश  एक नाही दोन नाही तर चक्क ट्रिपल रोलमध्ये दिसणार आहे. अंकुशबरोबर सई ताम्हणकर, पुजा सावंत आणि अमृता खानविलकर या मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या  लेडींग लेडीज् स्क्रीन शेअर करणार आहे.  शिवाय जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर हे कलाकारही विनोदाची षट्कारबाजी करायला रेडी आहेत. अवधुत गुप्तेचं झकास म्युझिक या सिनेमाला आहे. त्यामुळे फुल टू कॉमेडी असलेल्या या सिनेमाची झकास ट्रीट आपल्याला या विकेन्डला मिळणार आहे.

 

झकास या एकमेव मराठी सिनेमाबरोबर क्या यही सच है हा थोडासा गंभीर विषयावर भाष्य करणारा हिंदी सिनेमा रिलीज होतो आहे. आईपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. आपली जबाबदारी पार पाडतांना पोलिसांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो यावर सिनेमात प्रकाश टाकण्यात आला आहे. मात्र  या सिनेमाचं हवं तसं प्रमोशन न झाल्यामुळे कदाचित प्रेक्षक या सिनेमाकडे पाठ फिरवतील असं चित्र आहे.

 

सो या विकेन्डला मराठीतला एक झकास ऑप्शन प्रेक्षकांकडे आहे. शिवाय हिंदीत  क्या यही सच है या सिनेमाबरोबर एकही दमदार हिंदी सिनेमा रिलीज होत नसल्यामुळे  डॉनला या आठवड्यातही बॉक्सऑफिसवर गल्ला मिळवण्याची नामी संधी आहे.

Tags: