जेव्हा शाहरुख कतरिनाला 'किस' करतो....

कुटुंबवत्सल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुखचं सध्या त्याची पत्नी गौरीशी भांडण सुरू असल्याची बातमी एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. अशातच १८व्या स्क्रीन ऍवॉर्ड फंक्शनमध्ये भर स्टेजवरच कतरिना कैफला चुंबन दिलं.

Updated: Jan 16, 2012, 04:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

कुठल्याही ऍवॉर्ड फंक्शनमध्ये जेव्हा शाहरुख खान मंचावर येतो, तेव्हा फक्त मंचच नाही, तर संबंध वातावरण शाहरुख आपल्या ताब्यात घेऊन टाकतो. सिनेमात तो जेवढा लोकांना आवडतो त्याहूनही जास्त शाहरुख जेव्हा रंगमंचावर उस्फुर्तपणे आपलं ग्लॅमर दाखवून देतो, लोकांना आपल्याबरोबर सहभागी करून घेतो, ते पाहायला आवडतं. रंगमंचावरचा शाहरुख हा वेगळाच असतो. त्याच्या अवती भोवती कित्येक दिग्गज अभिनेते, सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री असल्या तरी आकर्षणाचा बिंदू शाहरुखच ठरतो.

 

कुटुंबवत्सल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुखचं सध्या त्याची पत्नी गौरीशी भांडण सुरू असल्याची बातमी एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. प्रियंका चोप्रासह असणारे त्याचे घनिष्ट संबंध या वादाचं कारण असल्याचं म्हटलं जातं. अशातच १८व्या स्क्रीन ऍवॉर्ड फंक्शनमध्ये भर स्टेजवरच कतरिना कैफला चुंबन दिलं. कतरिना गुलाबी शिफॉन साडीत अप्रतिम दिसत होती, यात वादच नाही.

 

वर, ट्विटरवर  ट्विट करताना त्याने असंही लिहीलं “विद्या, माधुरी, कतरिना, साजिद सगळ्यांसोबत खूप मजा आली, लोकांनाही खूप मजा वाटली असणार ” लोकांना तर मजा आलीच, पण आता गौरीची यावर काय प्रतिक्रिया आहे, हे पण विचारात घ्यायला हवं की नाही शाहरुखने? आणि त्यात कतरिना म्हणजे शाहरुखचा कट्टर दुष्मन सलमानची खास मैत्रीण... त्यामुळे सलमान आता यावर काय करतोय, तेच बघायचं..