www.24taas.com, बंगळुरू
दक्षिण पंथातील संघटन श्रीराम सेनेने 'डर्टी पिक्चर'चा कन्नडमध्ये होणाऱ्या रिमेकमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकाला घेतल्याबद्दल विरोध करीत प्रदर्शन केलं आहे. सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी प्रर्दशन करून वीणा मलिकच्या नावाला विरोध केला आहे.
सेनेच्या कार्यकर्त्यांनी वीणा मलिक विरोधात घोषणाबाजी केली, भारतात इतक्या प्रतिभाशाली अभिनेत्री असताना पाकिस्तानी अभिनेत्री घेण्याची काय गरज आहे? असा सवाल केला आहे... दक्षिण भारतातील सेक्स सिम्बॉल समजली जाणारी 'सिल्क स्मिता' अभिनेत्रीवर हा सिनेमा आधारित आहे. 'डर्टी पिक्चर' हिंदी सिनेमात विद्या बालन काम केलं आहे. त्यामुळे आता वीणाच्या नावाच्या विचार केला गेला होता.
मात्र वीणाच्या मनात असूनही आती तिला ह्या सिनेमात करताना काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे की, तिला सिनेमातील कामही सोडावं लागेल असेच दिसते. मागील वीणा मलिकने आपले निवस्त्र फोटो प्रदर्शित केले होते त्यानंतर भारतीय मु्स्लिम संस्थेने वीणा विरोधात फतवा काढला होता. त्यामुळे तिच्याविरोधात बरीच निदर्शने झाली होती.