ऐश्वर्या-अभिषेकची 'आराध्या' मीडिया समोर

बॉलिवूडचा बादशहा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी 'आराध्या' मीडिया समोर प्रथमच प्रगटली.

Updated: Jun 20, 2012, 12:08 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

बॉलिवूडचा बादशहा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी 'आराध्या' मीडिया समोर प्रथमच प्रगटली.

 

आराध्याचा जन्म हा काही सार्वजनिक प्रश्न नाही, असू सांगून बिग बीने कुतूहल वाढविले होते. त्यामुळे ऐश्वर्या आई होणार याबाबतची बातमी मीडियासमोर खूप उशिरा आली. आपण  दादाजी होणार असे टि्वट करून अमिताभने ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याचे कळविले. तेव्हापासून मीडियाची नजर 'जलसा'कडे लागली होती. आराध्याचा फोटोही मीडियाला उपलब्ध झाला नव्हता. मात्र, आराध्या कशी आहे, याची माहिती बच्चन कुटुंबियांकडून मीडियाला देण्यात  आली.

 

आराध्याची आई ऐश्वर्याने सांगितले, आराध्यावर शांत आहे. तिच्यावर आजीची (अभिनेत्री जया बच्चन) सावली आहे. तर जया बच्चन नातीबाबत खूप खुश होत्या. त्या म्हणाल्या, माझ्या नातीची योग्य ती काळजी तिची आई (ऐश्वर्या) आणि बाबा (अभिषेक) घेत आहेत. आराध्या, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याप्रमाणे उंच (लांब मुलगी) आहे. आराध्यामध्ये ऐश्वर्याची छबी दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यात साम्य आहे. अभिचेही गुण नातीत उतरले आहेत. आराध्या दिसायला सुंदर आहे. ती स्टॉबेरी सारखी दिसते. तिची आई तिला प्रेमाणे स्टॉबेरी बोलते. ज्यावेळी आराध्याचा जन्म झाला त्यावेळी स्टॉबेरीची आठवण  झाली.

 

आराध्या हे बाळ सुंदर आहेच. तिचे डोळे थोडे घारे आहेत. ती नेहमी हसमुख असते.तिला कोणाची नजर लागू नये म्हणून तिची काळजी घेतली जात आहे. हे आमच्यासाठी विशेष आहे. आराध्या ही भाग्यवान मुलगी आहे. तिने मिस वर्ल्ड ऐश्वर्या हिच्या पोटी जन्म घेतला आहे. ऐश्वर्या  सध्या मुलीसोबत लंडन येथे आहे. याठिकाणी आराध्याची विशेष काळजी घेतली जात आहे. लंडनमध्ये मुलीसोबत ऐश्वर्या शॉपिंगही करत आहे. मुलीच्या जन्मानंतर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत आहे, असे जया यांनी सांगितले.