Zomato IPO: बहुप्रतिक्षित झोमॅटोचा आयपीओ लवकरच बाजारात; सेबीमध्ये अर्ज दाखल

अॅप झोमॅटोने आपल्या बहुप्रतिक्षित आयपीओची प्रक्रीया सुरू केली आहे. आयपीओच्या माध्यमातून झोमॅटो 8250 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष आहे

Updated: Apr 28, 2021, 01:49 PM IST
Zomato IPO: बहुप्रतिक्षित झोमॅटोचा आयपीओ लवकरच बाजारात; सेबीमध्ये अर्ज  दाखल title=
representative image

Zomato IPO: ऑनलाईन फूड डिलिवरी अॅप झोमॅटोने आपल्या बहुप्रतिक्षित आयपीओची प्रक्रीया सुरू केली आहे. आयपीओच्या माध्यमातून झोमॅटो 8250 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष आहे. झोमॅटो 28 एप्रिल रोजी प्रस्तावित आयपीओसाठी सेबीमध्ये  Draft Red Herring Prospectus (DRHP) दाखल केला आहे. झोमॅटोचा आयपीओ गेल्या एका वर्षातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शेअर बाजारांवर नियंत्रण ठेवणारी सेक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI)संस्थेत जमा करण्यात आलेल्या डीआरएचपीनुसार, आयपीओमध्ये फ्रेश इक्विटी शेअर आणि सध्याचे शेअर धार इंफो एज लिमिटेडचा ऑफर फॉर सेल सहभागी असणार आहे. इंफो एज लिमिटेट जॉब पोर्टल नोकरी डॉट कॉमची पितृसंस्था आहे.

झोमॅटोच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या डीआरएचपीनुसार आयपीओतून कंपनी 8250 कोटी रुपये उभारणार आहे. त्यातील 7500 कोटी रुपये फ्रेश इश्यु होतील आणि इंफो एजकडून 750 कोटींची ऑफर फॉर सेल सहभागी असेल.
इंफो एजची झोमॅटोमध्ये 18 टक्के समभाग आहेत.