Zomato वरून जेवण मागवताय? पाहा व्हिडिओ

व्हिडिओ बघून बसेल धक्का 

Zomato वरून जेवण मागवताय? पाहा व्हिडिओ  title=

मुंबई : कामाच्या गडबडीत किंवा कंटाळा आला म्हणून अनेकदा आपणं जेवण Online Order करतो. यासाठी हल्ली Zomato वरून ऑर्डर करण्याचा ट्रेंड आहे. आपल्याला हवा तो पदार्थ हवा त्या वेळेत कधीही, कुठेही मागणवण्यासाठी सर्रास Zomato चा वापर केला जातो. पण हे असं Zomato वरून जेवणं मागवणं किती धोकादायक आहे ही बाब समोर आली आहे. 

Zomato डिलीवरी बॉय हे जेवण उघड्यावरून बसून खातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे Zomato च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. व्हिडिओतील ही व्यक्ती कुणीतरी ऑर्डर केलेल्या पार्सलमधील जेवण खात आहे. आणि एकदा नव्हे तर दोन वेळा ही गोष्ट घडत आहे. 

या अगोदर अशी नुसती चर्चा होती की, Zomato आणि Swiggy वरून ऑर्डर केल्यावर डिलिवरी करणारी मुलं ते जेवण खातात. पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब खरी असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहे. 

तसेच आपण जे ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो ते खरंच हायजेनिक आहे का? असा प्रश्न देखील उभा होतो. आपल्याला फक्त त्या पदार्थाचे फोटो ऑनलाईन दिसतात पण तो पदार्थ नेमका कसा? आणि कुणाकडून तयार होतो याची मात्र माहिती नसते त्यामुळे असं जेवण मागवताना थोडा विचार करावा. 

Zomato ही पदार्थ ऑर्डर करण्यासाठी सध्या सर्वाधिक लोकप्रिय कंपनी आहे. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने पार्सलमधील पदार्थ काढून खाल्ल्याची घटना घडली आहे. खाऊन झाल्यावर हा डिलिव्हरी बॉय पुन्हा पार्सल नीट ठेवून ते पोहोचवण्यासाठी निघतो.