झी २४ तास आजपासून नव्या कार्यालयात

महाराष्ट्राचं लोकप्रिय आणि आघाडीचं न्यूज चॅनेल, झी २४ तासचं कामकाज आजपासून नव्या कार्यालयात सुरू होणार आहे.

Updated: Oct 1, 2017, 04:16 PM IST
झी २४ तास आजपासून नव्या कार्यालयात title=

मुंबई : महाराष्ट्राचं लोकप्रिय आणि आघाडीचं न्यूज चॅनेल, झी २४ तासचं कामकाज आजपासून नव्या कार्यालयात सुरू होणार आहे. लोअर परळच्या मॅरेथॉन बिल्डिंगमध्ये या कार्यालयाचं कामकाज आजपासून सुरू होणार आहे. या निमित्ताने आज नवीन कार्यालयात गणेश पूजन करण्यात आलं. 

'झी २४ तास'ने गणेश पूजनासाठी नवा पायंडा पाडला, कारण ज्ञान प्रबोधिनीच्या सुचिता वर्तक यांनी पौराहित्य केलं, तसेच 'झी २४ तास'च्या महिला न्यूज अँकर हेमाली मोहिते, आणि मधुरा सुरपूर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.