तरुणांनो सावधान ! चाळीशीच्या आतल्या ५११ जणांचा कोरोनाने मृत्यू

 मुंबईत ४० वयोगटाच्या आतील तरुणांचा कोरोनामुळे झालेला मृत्यूचा (Death Rate) आकडा ५०० च्या वर गेलाय.

Updated: Nov 16, 2020, 10:38 PM IST
तरुणांनो सावधान ! चाळीशीच्या आतल्या ५११ जणांचा कोरोनाने मृत्यू title=

दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई :  तरुणांना कोविडचा (Covid 19) धोका नाही हा समज चुकीचा ठरवणारी मुंबई महापालिकेची आकडेवारी समोर आली आहे. डेथ ऑडिट कमिटीने (Death Audit Committe) केलेल्या पाहणीत ही धक्कादायक बाब उघड झालीय. मुंबईत ४० वयोगटाच्या आतील तरुणांचा कोरोनामुळे झालेला मृत्यूचा (Death Rate) आकडा ५०० च्या वर गेलाय.  

कोरोना सर्वाधिक धोका हा वृद्धांना असल्याचं सांगितलं जात होतं. पण मुंबईतली आकडेवारी तरुणांच्या बाबतीत सावध करणारी आहे. अनेक ध़डधाकट तरुणांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. महत्त्वाचं म्हणजे ज्या तरुणांना कोणतेही आजार नव्हते, अशा तरुणांचाही कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

वयोगट आणि मृत्यू

० ते ९ वयोगटातल्या १६ जणांचा, 
१० ते १९ वयोगटातल्या ३१ जणांचा 
२० ते २९ वयोगटातल्या १२० जणांचा 
तर ३० ते ३९ वयोगटातल्या ३४४ जणांचा मृत्यू झालाय

मुंबईत कोरोनाच्या मृतांमध्ये ५ टक्के तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे तरुणांनीही कोरोना काळात आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे बोरीवलीच्या  फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. सौरभ सांगोरे यांनी' झी २४ तास'ला सांगितलं.