गणपती विसर्जनासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचा उपाय

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यासोबतच आज पाचव्या दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही भाविकांना कठिण होत आहे. या पावसात अनेकांना घराबाहेर पडलं अशक्य झालं आहे.

Updated: Aug 29, 2017, 06:58 PM IST
गणपती विसर्जनासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांचा उपाय title=

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यासोबतच आज पाचव्या दिवसांच्या गणपतींचं विसर्जनही भाविकांना कठिण होत आहे. या पावसात अनेकांना घराबाहेर पडलं अशक्य झालं आहे.

अशात अनेकांना गणेश विसर्जनाचा प्रश्न पडला आहे. अशात पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी उपाय सुचवला आहे.

राज्यभरातील आणि खासकरून मुंबईतील गणेशभक्तांसाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी उपाय सुचवला आहे. याने तुमची समस्या सुटायला मदत होणार आहे. 

ज्यांच्याकडे पाच दिवसांचा गणपती आहे, त्यांनी गणपतीची उत्तरपूजा आज करून घ्यावी. मूर्तीचं विसर्जन उद्या किंवा पाऊस थांबल्यावर केलं तरी चालेल, असा मार्ग दा. कृ. सोमण यांनी सुचवला आहे.