मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांची ईडीच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे. काल रात्रभर चौकशी झाल्यानंतर राणा कपूर आज पुन्हा सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाला. दरम्यान काल ईडीने कपूरच्या समुद्र महल या वरळीतल्या घरावरही छापा टाकला. कपूर यांची यावेळी कसून चौकशी करण्यात आली. डीएचएफएलला बँकेने केलेल्या कर्जपुरवठ्याचा परतावा झालेला नाही. त्या संदर्भात राणा कपूरवर केस आहे. ईडीने या छाप्यात काही पुरावे गोळा केले. बँकेने केलेल्या या कर्ज वाटपात कपूरचा नेमका सहभाग काय होता याचा तपास केला जात आहे. या कर्जपुरवठ्यानंतर कपूरच्या बायकोच्या खात्यात जमा झालेल्या मोठ्या रक्कमांची चौकशीही सुरू आहे.
Mumbai: Rana Kapoor, #YesBank founder has been taken to Enforcement Directorate office for questioning. More details awaited. pic.twitter.com/IvjtSaWpEm
— ANI (@ANI) March 7, 2020
दरम्यान, आर्थिकदृष्ट्या संकटात अडकलेल्या येस बँकेमध्ये एसबीआय (SBI) २४५० कोटी रुपये म्हणजे ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करणार असल्याची घोषणा एसबीआयचे संचालक रजनीश कुमार यांनी केली आहे. खातेधारकांनी, गुंतवणूकदारांनी आता काळजी करू नये असा दिलासाही त्यांनी दिलाय. याबाबत ठोस मार्ग काढण्यासाठी एक कायदेशीर टीम कार्यरत असून सोमवारपर्यंत निर्णय होईल, असे रजनीश कुमार यांनी सांगितले आहे. एक महिन्यानंतर खातेधारक खात्यातून ५० हजार पेक्षा अधिक रक्कम एका महिन्यात काढू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरी ईडीने रात्रीच छापेमारी केली. काल रात्रीच्या सुमारास ईडीन छापा टाकला. दरम्यान मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला असून, कर्जवाटप संदर्भात सर्व कागदपत्र ईडीकडून तपासण्यात येतायेत. राणा कपूर विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीय. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना देश सोडता येणार नाही. ईडीने कपूरच्या समुद्र महल या वरळीतल्या घरावर छापा टाकला.