सावधान... कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा मुंबईला धोका

कोरोनाच्या XBB व्हेरियंट राज्यात दाखल, लहान मुलांनाही व्हायरसच्या नव्या व्हेरियंटची लागण...   

Updated: Oct 30, 2022, 08:01 AM IST
सावधान... कोरोनाच्या XBB व्हेरियंटचा मुंबईला धोका title=

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरसने (coronavirus) फक्त देशातचं नाही तर, संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे आता पुन्हा राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे.. सिंगापूर आणि इतर देशांमध्ये आढळून आलेला कोरोनाचा XBB (xbb variant) हा नवा व्हेरियंट राज्यात वेगानं पसरू लागलाय. या नव्या व्हेरियंटचे राज्यात 36 नवे रुग्ण आढळून आले असून यातील 21 रुग्ण पुण्यात तर 10 रुग्ण ठाण्यात आढळून आलेत. कोरोनाचा XBB संकट मुंबईवर देखील आहे. (corona in india)

कोरोनाचा XBB  व्हेरियंटचा धोका वाढल्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय. XBB  व्हेरियंटच्या संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी व्हेरियंट सौम्य स्वरूपाचा असेल.. मत टास्क फोर्सने व्यक्त केले आहे. (omicron xbb variant)

XBB  व्हेरियंटची लागण 41 ते 60 वयोगटातील 14 रुग्णांना झाली आहे. त्यानंतर 13 रुग्ण 21 ते 40 वयोगटातील असून 7 रुग्ण 60 वयोगटातील आहेत. लहान मुलांना देखील XBB  व्हेरियंटची लागण झाली आहे. 11 ते 20 वयोगटातील २ रुग्णांना XBB  व्हेरियंटची लागण झाली आहे. ( xbb covid 19 variant)

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या... (corona in mumbai)
मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार सुरू असून शनिवारी दिवसभरात 132 नव्या रुग्णांची नोंद झाली. शनिवारी 14 करोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.